फसवलं,फसवलं ! एकदा नाही तर अनेकदा गरोदर असल्याचे सांगत गुगली टाकायची 'ही' अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 11:15 AM2020-10-14T11:15:34+5:302020-10-14T11:22:35+5:30

अनिता हसनंदानी आई होणार म्हटल्यावर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण त्याआधी दीर्घ काळापासून तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरु होत्या. मात्र दरवेळी या सगळ्या अफवा तिने सांगितले होते. मात्र काही दिवसांपूर्वी अचानक अनिताने ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. माध्यमातून अनिताने आपल्या आयुष्यातील ही गोड बातमी सांगतचा शुभेच्छांचा वर्षाव झाला.

मात्र यापूर्वीही अनिताने गरोदर असल्याचे सांगत चाहत्यांचीच फिरकी घेतली होती.

अनेकदा तिने डमी बेबी बंम्प फ्लॉंट करत गरोदर असल्याचे सांगायची.

यावेळी मात्र ती खरोखरच गरोदर आहे. त्यामुळे अनितानेच तिचे पूर्वीचे फोटो शेअर करत प्रेग्नंसीची खोटी माहिती देत फसावयची असे सांगितले आहे.

अनिताने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आणि स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.

'कभी सौतन, कभी सहेली', 'ये हैं मोहब्बते', 'नागीन 3' या मालिकेतील तिच्या भूमिका प्रचंड गाजल्यात. 2013 मध्ये अनिताने रोहित रेड्डीसोबत लग्नगाठ बांधली होती.

रोहितही अनिताची किती काळजी घेतो, हेही कुणापासून लपून राहिलेले नाही. त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात.

सध्या अनिता प्रेग्नंट आहे त्यामुळे तिला जराही कोणत्या गोष्टीचा त्रास होणार नाही याची खबरदारी सध्या रोहित घेताना दिसतोय.

अनिताने नेहमी आनंदितच राहावे असा त्याचा अट्टहास असतो. त्यामुळे सध्या हे कपल त्यांचे खास क्षण एन्जॉय करताना पाहायला मिळतायेत.

प्रेग्नंसीमध्ये अनिताच्या चेह-यावरही कमालीचा ग्लो आल्याचे पाहायला मिळतंय.

बाळाच्या आगमनाची चाहुल लागताच सध्या हे कपल खूप आनंदात असून बाळाच्या येण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत.