बूट पॉलिश करून पोट भरणा-या सनीच्या आवाजाची जादू चालली, इंडियन आयडल ट्रॉफीवर कोरलं नाव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 15:48 IST2020-02-24T13:47:13+5:302020-02-24T15:48:00+5:30
Sunny Hindustani Won The Indian Idol Show's 11th Season

इंडियन आयडल 11 चा विजेता सनी हिंदुस्तानी
कधी रस्त्यावर लोकांचे बूट पॉलिश करणारा सनी हिंदुस्तानी याला अखेर त्याच्या कष्टाचे फळ मिळाले.
इंडियन आयडल 11 ची ट्रॉफी जिंकत सनीने एक वेगळा इतिहास रचला
पंजाबच्या भटींडा येथील अमरपुरा भागात राहणा-या सनीच्या आवाजाने सर्वांना वेड लावले आहे. सोशल मीडियावरही तो लोकप्रिय झाला आहे.
अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या सनीची आई फुगे विकण्याचा व्यवसाय करत होती. तर सनी स्वत: उपजीविकेसाठी बूट पॉलिश करत असे.
गरीब कुटुंबातील सनीने सर्वांना मागे टाकत इंडियन आयडलचे विजेतेपद पटकावले. सध्या त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
काल इंडियन आयडल 11 चा विजेता म्हणून सनी हिंदुस्तानीचे नाव पुकारण्यात आले आणि सनीला भावना रोखता आल्या नाहीत
सनी हा पंजाबच्या भटिंडाचा राहणारा आहे. संगीताचे कुठलेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न घेता फक्त गाणं ऐकून शिकलेल्या सनीची तुलना नुसरत फतेह अली यांच्याशी केली गेली.
इंडियन आयडल 11 मध्ये महाराष्ट्रातील रोहित राऊत हा या उपविजेता ठरला
इंडियन आयडल 11 च्या सर्व जजेसला त्याने आपल्या आवाजाने प्रभावित केले.
विजेतेपद पटकावणा-या सनी हिंदुस्थानीला रोख 25 लाख, इंडियन आयडलच्या ट्रॉफीने गौरविण्यात आले. याचवेळी भुषण कुमार यांच्या टी-सीरीजच्या आगामी सिनेमात गाण्याचे कॉन्ट्रॅक्टही त्याला मिळाली. टाटा कंपनीची नवी एल्ट्रॉज कारही सनी हिंदुस्थानीला मिळाली