"प्रवास कुणासोबत घडतो तेच महत्वाचं ठरतं!", कुशल बद्रिकेची पत्नीसोबत कोकण सफर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 11:43 AM2024-05-29T11:43:11+5:302024-05-29T12:06:42+5:30

Kushal Badrike : बिझी शेड्युलमधून वेळ काढत कुशल बद्रिके पत्नी सुनयना सोबत कोकण सफारीला गेला आहे.

अभिनेता कुशल बद्रिके मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. तो सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो.

बिझी शेड्युलमधून वेळ काढत कुशल बद्रिके पत्नी सुनयना सोबत कोकण सफारीला गेला आहे.

कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर गुहागरला फिरतानाचे फोटो शेअर केले आहेत. यात त्याच्यासोबत त्याची पत्नीदेखील पाहायला मिळत आहे.

कुशल बद्रिकेने नुकतेच बोटीवरील फोटो शेअर करत लिहिले की, कधी कधी पोहोचायचं कुठे ? हे काही फार मॅटर करत नाही , प्रवास कुणा सोबत घडतो तेच महत्वाचं ठरतं !

कुशल बद्रिकेच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत आहे. चाहते त्याच्या या व्हॅकेशनबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून कुशलने सर्वांना खळखळून हसवलं.

आता कुशल मॅडनेस मचाएंगे या हिंदी शोमध्ये झळकतोय. या शोमध्ये कुशलसोबत मराठमोळे कलाकार म्हणजेच अभिनेत्री हेमांगी कवी आणि अभिनेता गौरव मोरे दिसत आहेत.

कुशल बद्रिकेच्या अभिनयाच्या प्रवासात कुटुंबाबरोबरच त्याच्या पत्नीचा म्हणजेच सुनयनाचा देखील महत्त्वाचा वाटा आहे.