आयुष्यभर साथ देण्याचं दिलेलं वचन; ४ वर्षांनंतर अभिनेत्रीचं झालं ब्रेकअप?, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 04:50 PM2024-08-15T16:50:35+5:302024-08-15T17:17:50+5:30

Jasmin Bhasin And Aly Goni : जॅस्मिन आणि तिचा बॉयफ्रेंड अली गोनीचं ब्रेकअप झाल्याचीही जोरदार चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री जॅस्मिन भसीन तिच्या 'अरदास' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. हा चित्रपट १३ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

जॅस्मिन आणि तिचा बॉयफ्रेंड अली गोनीचं ब्रेकअप झाल्याचीही जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, तिचं आणि अलीचं ब्रेकअप झालं नसल्याचं अभिनेत्रीने सोशल मीडियावर स्पष्ट केलं आहे.

या चित्रपटाच्या प्रीमिअरच्या वेळी ती पुन्हा एकदा ब्रेकअपच्या अफवांमुळे चर्चेत आली होती. यावर अभिनेत्रीने प्रतिक्रिया देत "हे सर्व बकवास" असल्याचं म्हटलं आहे.

कॅमेऱ्यासमोर अभिनेत्रीने हे म्हटल्यानंतर चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ब्रेकअपच्या बातम्यांदरम्यान अली आणि जॅस्मिनही डिनर एन्जॉय करताना दिसले.

जॅस्मिन आणि अलीची जोडी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे, त्यांना एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांना आनंद होतो.

रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी अली आणि जॅस्मिन अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र होते. या दोघांचे असंख्य चाहते आहेत.

बिग बॉस १४ मध्ये दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. ते नेहमीच एकत्र दिसत असतात. त्यामुळे आता हे दोघं ऑफिशिअली नेमकं कधी लग्न करणार याची उत्सुकता चाहत्यांना आहे.