the kapil sharma show fame kiku sharda beautiful wife priyanka sharda pics
अशी आहे ‘बच्चा यादव’ची रिअल लाईफ, पाहा किकू शारदाच्या हॅपी फॅमिलीचे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 09:15 AM2021-04-13T09:15:00+5:302021-04-13T09:20:02+5:30Join usJoin usNext पडद्यावर सर्वांना खळखळून हसवणारा किकू ख-या आयुष्यातही अगदी मस्तमौला आहे. ‘द कपिल शर्मा शो’ फेम अॅक्टर- कॉमेडियन किकू शारदाला कोण ओळखत नाही. पडद्यावर सर्वांना खळखळून हसवणारा किकू ख-या आयुष्यातही अगदी मस्तमौला आहे. पत्नी आणि दोन मुलांसोबत किकू धम्माल मस्ती करतो. किकूच्या इन्स्टा अकाऊंटवर एक नजर टाकल्यास याचा अंदाज येईल. 2002 मध्ये किकूने प्रियंकासोबत लग्न केले. दोघांना आर्यन आणि शौर्य अशी दोन मुलं आहेत. किकूची पत्नी प्रियंका तशी लाईम लाईटपासून दूर राहते. पण ‘नच बलिये’च्या 6 व्या सीझनमध्ये प्रियंका व किकू कपल म्हणून सहभागी झाले होते. प्रियंका ‘कपिल शर्मा शो’मध्येही दिसली होती. एका खास एपिसोडमध्ये ती किकूसोबत शोमध्ये हजर होती. किकू व प्रियंका पब्लिकमध्ये फार कमी दिसतात. पण सोशल मीडियावर दोघांची रोमॅन्टिक केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. किकूच्या इन्स्टा अकाऊंटवर कुटुंबाचे अनेक व्हिडीओ दिसतात. त्याने अनेक फॅमिली व्हिडीओ शेअर केले आहेत. कीकू शारदाची पत्नी प्रियंका मलेशियामध्ये राहत होती. दोघांचेही आई- वडिल स्थळ शोधत होते. त्यावेळी लग्नासाठी बनवलेला बायोडेटा या दोघांच्या आई- वडिलांकडे आला होता. त्यावेळी कीकू शारदालाही प्रियंकाचा फोटो पाहूनच आवडली होती.टॅग्स :किकू शारदाKiku Sharda