गुलाबाची कळी बघा हळदीने माखली...! पाहा, अभिनेत्री करिश्मा तन्नाच्या हळदीचे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 10:16 AM 2022-02-04T10:16:50+5:30 2022-02-04T10:52:30+5:30
Karishma Tanna Wedding : टीव्ही व बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा तन्ना हिच्या लग्नाच्या विधी सुरु झाल्या आहेत. करिश्माच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. टीव्ही व बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा तन्ना हिच्या लग्नाच्या विधी सुरु झाल्या आहेत. करिश्माच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
उद्या 5 फेब्रुवारीला करिश्मा मुंबईतील बिझनेसमन आणि तिचा बॉयफ्रेंड वरुण बंगेरा याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे.
मौनी रॉयसारखीच करिश्मालाही गोव्यात हळद लागली. यावेळी करिश्माने व्हाईट कलरचा शरारा घातला होता. यात ती कमालीची सुंदर दिसत होती.
व्हाईट आऊटफिट आणि त्यावर व्हाईट फ्लोरल ज्वेलरीत करिश्माने धम्माल पोझ दिल्यात. हळदीचे काही फोटो तिने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत.
करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेरा यांचा विवाह दोन पद्धतीने होणार आहे. लग्न गुजराती आणि दक्षिण भारतीय परंपरेनुसार होणार आहे.
करिश्मा गुजराती आहे, त्यामुळे लग्नाचे विधी गुजराती तर वरुण हा दक्षिण भारतीय आहे. त्यामुळे दोनही पद्धताने लग्न होणार आहे.
नोव्हेंर 2021 मध्ये करिश्मा व वरूणचा साखरपुडा झाला होता. साखरपुड्याचे फोटोही तिने सोशल अकाऊंटवर शेअर केले होते.
करिश्मा तन्नाने आजवर क्योंकी साँस भी कभी बहू थी, कही तो मिलेंगे, देस में निकला होगा चाँद, शरारत, कुसूम, जोर का झटका, कॉमेडी नाइट्स विद कपिल, नच बलिए 7 आणि फियर फॅक्टर : खतरों के खिलाडी अशा अनेक शोमध्ये काम केले आहे.