Kartiki Gaikwad seen in a glamorous look enjoying vacation with husband after birth of a baby boy
'लिटिल चॅम्प' च्या जन्मानंतर ग्लॅमरस लूकमध्ये दिसली कार्तिकी; बाळाचा फोटो कधी दाखवणार? म्हणाली... By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 01:48 PM2024-11-18T13:48:22+5:302024-11-18T14:00:15+5:30Join usJoin usNext कार्तिकी गायकवाडचा ग्लॅमरस लूक! 'सा रे ग म प' लिटिल चॅम्प्स फेम कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) आता एका मुलाची आई आहे. कार्तिकीने २३ व्या वर्षीच लग्न केलं आणि चार वर्षांनी तिला बाळही झालं. लेकाच्या जन्मानंतर कार्तिकी नवऱ्यासोबत फिरायला गेली आहे. तिने तिचे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. यात तिचा ग्लो पाहून अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. प्रिंटेड टॉप, मरुन रंगाची पँट, गॉगल असा तिचा लूक आहे. या किलर लूकमध्ये तिने पोज देत फोटोसेशन केले आहे. ती एका मुलाची आई आहे यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. 'सुंदर फोटो. तू ग्लो करत आहेस','प्रेग्नंसीनंतर तू आणखी ग्लोईंग दिसत आहेस' अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. कार्तिकीचे हे फोटो नक्की कोणत्या ठिकाणचे आहेत हे तिने लिहिलेलं नाही. पूलसाईडला तिने काढलेल्या फोटोंची तर बातच और आहे. कार्तिकीने अद्याप तिच्या मुलाचा चेहरा दाखवलेला नाही. अनेक चाहत्यांनी तिला बाळाचा फोटोही दाखवा अशी विनंती केली आहे. यावर कार्तिकीने 'लवकरच' अशी कमेंट करत त्यांना आश्वासन दिलं आहे. कार्तिकीच्या नवऱ्याचं नाव रोनित पिसे आहे. तो तिच्यासारखा गायक नाही तर शेअर मार्केटमध्ये आहे. तो ट्रेडिंगच्या जगातला मास्टर आहे. गुंतवणूकीसंदर्भात तो मार्गदर्शन करत असतो. त्याचा स्वत:चा व्यवसाय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो ट्रेडिंग करत असून नवीन लोकांना याचे धडेही देत आहे. - फोटो सौजन्य (Kartiki kalyanji Gaikwad Instagram)टॅग्स :सेलिब्रिटीसंगीतसोशल मीडियासा रे ग म पCelebritymusicSocial MediaSa Re Ga Ma Pa Show