कातिलाना!! श्वेता तिवारीच्या हॉट, अतरंगी लूकवर चाहते फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 16:04 IST2021-07-09T15:39:45+5:302021-07-09T16:04:19+5:30
‘खतरों के खिलाडी 11’ लॉन्च इव्हेंटसाठी श्वेताने अगदी हटके ड्रेस निवडला. श्वेता या कपड्यांमध्ये इतकी हॉट दिसत होती की सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या.

गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वादामुळे चर्चेत असलेली श्वेता तिवारी लवकरच ‘खतरों के खिलाडी’च्या 11 व्या सीझनमध्ये दिसणार आहे.
श्वेता तिवारीने स्वबळावर इंडस्ट्रीत तिची एक भक्कम जागा निर्माण केली आहे. याचमुळे श्वेता बिनधास्त दिसते. फॅशनच्या बाबतीतही तिचा हाच बिनधास्त अंदाज सर्वांना हैराण करतो.
‘खतरों के खिलाडी 11’ लॉन्च इव्हेंटमध्ये श्वेताच्या अशाच बिनधास्त फॅशनने सर्वांचे लक्ष वेधले.
या इव्हेंटसाठी श्वेताने अगदी अतरंगी व हटके ड्रेस निवडला. श्वेता या कपड्यांमध्ये इतकी हॉट दिसत होती की सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या.
व्हाईट कलरचा प्रिंट पँट-सूटमध्ये श्वेता यावेळी दिसली. सेलिब्रिटी स्टायलिस्ट विक्टर रॉबिन्सनने तिचा हा ड्रेस डिझाईन केला होता.
या ड्रेसमध्ये श्वेताने फोटोशूटही केले. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
श्वेताने ख-या आयुष्यात अनेक चढऊतार पाहिले. वयाच्या केवळ 18 व्या वर्षी तिने राजा चौधरीसोबत लग्न केले. पण राजाच्या छळाला कंटाळून तिने त्याला घटस्फोट दिला. यानंतर अभिनव कोहलीसोबत तिने दुसरा संसार थाटला. पण हे दुसरे लग्नही फार काळ टिकू शकले नाही.
पहिल्या पतीपासून श्वेताला पलक नावाची मुलगी आहे. तर दुस-या पतीपासून रियांश नावाचा मुलगा.
2001मध्ये टीवी शो 'कहीं किसी रोज' सेमधून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.