Mc Stan : २३ वर्षांचा हा छोकरा असा किती श्रीमंत असावा? किती आहे एमसी स्टॅनची संपत्ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 12:17 PM2023-02-13T12:17:23+5:302023-02-13T12:23:31+5:30

Bigg Boss 16 Winner Mc Stan Property Net Worth : बिग बॉसच्या घरात एमसीच्या महागड्या कपड्यांची, बुटांची, त्याच्या ज्वेलरीची प्रचंड चर्चा झाली. २३ वर्षाचा हा छोकरा असा किती श्रीमंत असावा? असा प्रश्न अनेकांना पडला.

पुण्याचा एमसी स्टॅन बिग बॉस १६ चा विजेता ठरला. २३ वर्षाचा एमसी स्टॅन एक हिंदी रॅपर आहे. युट्युबवरचे त्याचे रॅप सॉन्ग प्रचंड लोकप्रिय आहेत. त्याची युनिक पर्सनॅलिटी बघून त्याला बिग बॉस हा शो ऑफर केला गेला आणि स्टॅनने या संधीचं सोनं केलं.

बिग बॉसच्या घरात एमसीच्या महागड्या कपड्यांची, बुटांची, त्याच्या ज्वेलरीची प्रचंड चर्चा झाली. २३ वर्षाचा हा छोकरा असा किती श्रीमंत असावा, असा प्रश्न अनेकांना पडला. तर आज आम्ही त्याच्या संपत्तीबद्दल सांगणार आहोत.

‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर नाव कोरणारा एमसी स्टॅन पुण्याचा आहे. त्याचं खरं नाव अल्ताफ तडवी आहे. बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली तेव्हा त्याने ७० ते ८० लाख रूपयांचा नेकपीस घातला होता. त्याच्या पायात ८० हजारांचे बूट होते.

‘बिग बॉस’च्या घरातही तो अनकेदा गळ्यातील चेन फ्लॉन्ट करताना दिसला. त्या चेनची किंमती दीड कोटी इतकी आहे. रिपोर्टनुसार, एमसी स्टॅन सुमारे १६ कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.

कॉन्सर्टमधून एमसी स्टॅनला मोठी रक्कम मिळते. एका प्रोग्रामसाठी तो ५ ते १० लाख रूपये चार्ज करतो. अर्थात इथपर्यंत पोहोचण्यासाठी स्टॅनला बराच संघर्ष करावा लागला.

पुण्यात जन्मलेल्या एमसी स्टॅनचं कुटुंब एका चाळीत राहायचं. १२ व्या वर्षी स्टॅनने कव्वाली गाण्यास सुरुवात केली. आज एमसी स्टॅन हिप-हॉप इंडस्ट्रीतील मोठा चेहरा आहे.

सुरुवातीला कुटुंबच त्याच्या विरोधात होतं. अभ्यास सोडून हे काय रॅप रॅप करतो, म्हणून त्याचे आईवडील त्याला दिवसरात्र बोलायचे. एकेकाळी त्याला रस्त्यावर रात्र काढावी लागली.

एमसी स्टॅनने ‘समझ मेरी बात को’ या गाण्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. या गाण्यात त्याने DIVINE आणि EMIWAY सारख्या रॅपर्सचा उल्लेख करत त्यांना रोस्ट केलं होतं. त्याचं गाणं व्हायरल झालं आणि स्टॅन लोकप्रिय झाला.

यानंतर एमसी स्टॅनने अस्तगफिरुल्ला नावाचं एक गाणं रिलीज केलं. यात त्याने आपला संघर्ष, आर्थिक अडचणी आणि भूतकाळातल्या चुकांबद्दल भाष्य केलं होतं. त्याचं हे गाणंही गाजलं.

एमसीने अनेक गाणी गायली पण ‘वाटा’ या गाण्यानं त्याला खरी लोकप्रियता मिळवून दिली. यूट्यूबवर या गाण्याला जवळपास २१ मिलियन व्ह्यूज मिळाले.