कोकणातील मंदिरात सप्तपदी, बहिणींनी पिळले नवऱ्याचे कान; अंकिता वालावलकर-कुणालच्या लग्नातील खास क्षण

By कोमल खांबे | Updated: February 17, 2025 16:08 IST2025-02-17T15:43:27+5:302025-02-17T16:08:42+5:30

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. अंकिताने संगीतकार कुणाल भगतसह लग्नगाठ बांधली आहे.

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. अंकिताने संगीतकार कुणाल भगतसह लग्नगाठ बांधली आहे.

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लक्ष्मी-नारायण मंदिरात अंकिता-कुणालचा विवाहसोहळा पार पडला.

कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत अंकिता आणि कुणालने सप्तपदी घेतले. त्यांच्या लग्नातील काही खास क्षणांचे फोटो समोर आले आहेत.

लग्नासाठी अंकिताने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. तर कुणालने पिवळ्या रंगाचं धोतर परिधान करत पारंपरिक लूक केला होता.

अंकिताने लग्नात रॉयल एन्ट्री घेतली. तिच्या लग्नातील फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अंकिताच्या बहिणींनीच तिच्या नवऱ्याचे कान पिळले.

अंकिता-कुणालच्या लग्नाच्या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.