Lagir Jhal Ji Fame Jaydi Aka Purva Shinde is too glamours, see her hot pic
'लागिरं झालं जी' मालिकेतील जयडी खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पहा तिचा हॉट अंदाज By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 04:17 PM2019-06-20T16:17:18+5:302019-06-20T16:20:59+5:30Join usJoin usNext छोट्या पड्यावरील 'लागिरं झालं जी' या मालिकेतील अजिंक्य आणि शीतल ही जोडी रसिकांना चांगलीच भावते आहे. याशिवाय मालिकेतील इतर कलाकारसुद्धा तितकेच लोकप्रिय झाले आहेत. जयडी साकारणारी पूर्वा शिंदे ही चाहत्यांमध्ये चांगलीच फेव्हरेट ठरत आहे. 'लागिरं झालं जी' या मालिकेत ही जयडी आपल्याला नेहमीच भारतीय पेहरावात दिसून येते. पण खऱ्या आयुष्यात तिला वेस्टर्न कपडे घालायला देखील आवडतात. तिच्या इन्स्टाग्रामच्या पेजवर तर आपल्याला तिचे स्टायलिश अंदाजातील अनेक फोटो पाहायला मिळतात. तिच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळतो. सोशल मीडियावर जयडीच्या फोटोंवर नजर टाकली तर तिचे विविध अदा असलेले फोटो तुम्हाला पाहायला मिळतात. मालिकेत बहुतांशी साडीमध्ये आणि पंजाबी ड्रेसमध्ये वावरणारी जयडी ही प्रत्यक्षात रिअल लाइफमध्येही स्टायलिश असल्याचं या फोटोवरून पाहायला मिळत आहे. टॅग्स :लागिरं झालं जीझी मराठीLagir Jhala JiZee Marathi