३८व्या वर्षी अभिनेत्री होणार आई! मधुबालाचं बेबी शॉवर, फ्लॉन्ट केला बेबी बंप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 03:45 PM2024-09-04T15:45:26+5:302024-09-04T15:59:54+5:30

'मधुबाला' फेम दृष्टी धामी लवकरच आई होणार आहे. काही महिन्यांपूर्वीच दृष्टीने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती.

'मधुबाला' फेम दृष्टी धामी लवकरच आई होणार आहे. काही महिन्यांपूर्वीच दृष्टीने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती.

नुकतंच दृष्टीचं बेबी शॉवर पार पडलं. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दृष्टीने बेबी शॉवरसाठी निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यामध्ये तिने बेबी बंपही फ्लॉन्ट केल्याचं दिसत आहे.

दृष्टीच्या बेबी शॉवरला कलाविश्वात सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. नकुल मेहता, जानकी मेहता हे कलाकार उपस्थित होते.

अभिनेत्रीच्या बेबी शॉवरसाठी खास डेकोरेशनही करण्यात आलं होतं. फुग्यांनी खास सजावट करण्यात आली होती.

दृष्टीने 'गीत','मधुबाला','दिल मिल गए','परदेस मे है मेरा दिल' ,'एक था राजा एक थी रानी' या मालिकांमध्ये काम केलं आहे.

२०१५ साली बिझनेसमन तिने नीरज खेमकासोबत लग्नगाठ बांधली. आता लग्नानंतर ९ वर्षांनी आईबाबा होणार असल्यामुळे ते दोघेही आनंदी आहेत. ऑक्टोबर महिन्यात दृष्टी तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.