'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने शेअर केले पूलमधील फोटो, नेटकरी म्हणाले- "असे फोटो टाकतोस म्हणून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 01:29 PM2024-05-30T13:29:13+5:302024-05-30T13:32:45+5:30

ओंकार राऊतचे स्विमिंग पूलमधील फोटो व्हायरल, नेटकऱ्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या शोमुळे अनेक नवोदित कलाकारांना त्यांचं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली.

या संधीचं सोनं करणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता ओंकार राऊत. अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलेल्या ओंकारला हास्यजत्रेमुळे नवी ओळख मिळाली.

ओंकार सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स तो चाहत्यांना देत असतो.

नुकतंच ओंकारने त्याच्या इन्स्टाग्रामवर स्विमिंगपूलमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्याने "POOL मधे मला PUSH केल्यावर हे होतं", असं कॅप्शन दिलं आहे.

ओंकारच्या या फोटोंवर चाहत्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.

"भावा असले फोटो टाकतो म्हणून प्राजू रिप्लाय देत नाही", "अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन...तुला फ्रेशर्स आणि टाइमपासमध्ये पाहिलं होतं", अशा कमेंट्स केल्या आहेत.

"गरमी फार वाढली आहे ना? हे वयच असे असते...Enjoy the chil...", "PP ने क्लिक केला असेल हा फोटो", "पानी मे आग लगा दी", अशाही कमेंट्स आहेत.

ओंकारचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा पाऊस पाडला आहे.

ओंकारने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'फ्रेशर्स' या मालिकेत तो दिसला होता. 'टाइमपास', 'लकडाऊन बी पॉझिटिव्ह' या सिनेमांमध्येही तो झळकला आहे.