'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरेंची दुबईवारी! फोटो पाहून नेटकरी म्हणाले- "शालू कुठे आहे"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 09:37 AM2024-06-04T09:37:12+5:302024-06-04T09:41:17+5:30

कामातून वेळ काढत प्रभाकर मोरे सध्या दुबईला फिरायला गेले आहेत. याचे फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असलेला कार्यक्रम आहे. अनेक कलाकारांना या शोमुळे लोकप्रियता मिळाली.

उत्तम अभिनय आणि कमालीची विनोदबुद्धी असलेले प्रभाकर मोरे यांनाही हास्यजत्रेमुळेच लोकप्रियता मिळाली.

कामातून वेळ काढत प्रभाकर मोरे सध्या दुबईला फिरायला गेले आहेत. याचे फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.

प्रभाकर मोरेंनी दुबईतील फोटो शेअर करत "हबिबी कम टू दुबई" असं कॅप्शन दिलं आहे.

दुबईतील बुर्ज खलिफालादेखील मोरेंनी भेट दिली. याचाही फोटो त्यांनी शेअर केला आहे.

प्रभाकर मोरेंच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.

"दुबईला शालू झालीच पाहिजे", "काय समजलिव..." असं काहींनी कमेंटमध्ये म्हटलं आहे.

तर "कातील प्रभाकर मोरे", "आता वातावरण कातिल होईल", "शालू कुठे आहे", "वाह दादा" अशा कमेंट्सही केल्या आहेत.

प्रभाकर मोरेंचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.