इंडस्ट्रीत येण्यासाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने बदललं नाव, म्हणाली- "लंडनमध्ये असताना..."

By कोमल खांबे | Updated: March 12, 2025 11:57 IST2025-03-12T11:37:28+5:302025-03-12T11:57:29+5:30

हास्यजत्रेतील ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ईशा डे आहे. ईशाने इंडस्ट्रीत येण्याआधी तिच्या नावात मोठा बदल केला.

सिनेइंडस्ट्रत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी इंडस्ट्रीत येण्यासाठी स्वत:च नाव बदललं. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीनेदेखील इंडस्ट्रीत येण्याअगोदर स्वत:च्या नावात बदल केला.

हास्यजत्रेतील ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ईशा डे आहे. ईशाने इंडस्ट्रीत येण्याआधी तिच्या नावात मोठा बदल केला.

ईशाने लंडन स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. तिथे ऑडिशनदरम्यानचा किस्सा सांगताना ईशाने नाव बदलल्याचा खुलासा आनंद नाडकर्णी यांना दिलेल्या मुलाखतीत केला होता.

"माझं खरं नाव ईशा वडनेरकर आहे. मी लंडन स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकत होते. तिथे स्टेज नेम, स्क्रिन नेम घेण्याची पद्धत आहे".

"माझा कोर्स संपताना मी कास्टिंग ऑडिशनसाठी जायला लागले. तिथे वेळेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे ऑडिशनसाठी फक्त १५ मिनिटांचा स्लॉट असतो".

"मी ऑडिशनला गेल्यानंतर माझं नाव ते विचारायचं. मी ईशा वडनेरकर असं म्हटल्यानंतर ते मला आडनावाबद्दल विचारायचे. त्यांना जाणून घेण्यात उत्सुकता वाटायची. हे गमतीशीर संभाषण ५ मिनिटं चालू राहायचं आणि मग ऑडिशनला १० मिनिटचं मिळायची".

"माझे जे ट्यूटर होते त्यांनी मला सांगितलं की इथे सगळे वेगळं नाव घेतात त्यामुळे तूदेखील घेऊ शकतेस. मग मी आईबाबांशी बोलले".

"लहानपणापासूनच मी जे बोलेन त्याला त्यांनी सपोर्ट केला आहे. त्यामुळे त्यांना काहीच हरकत नव्हती. मग आम्ही एकत्र बसून वेगवेगळी आडनावं काढली".

"मला सोपा शब्द हवा होता आणि त्यातून मी भारतीय असल्याचंही दाखवायचं होतं. मग अनेक नावांमधून ईशा डे हे नाव फायनल केलं. मला अजूनही वेस्टर्नमध्ये काम करण्याची इच्छा आहे".

ईशाने मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्येही काम केलं आहे. बॉबी देओलच्या 'आश्रम' वेब सीरिजमध्येही ती दिसली होती.