"तो रोज मला I Love You असं पाठवायचा आणि...", शिवाली परबला आला चाहत्याचा विचित्र अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:23 IST2025-01-14T17:19:50+5:302025-01-14T17:23:50+5:30

मुलाखतीत शिवालीने एका चाहत्याचा विचित्र अनुभव सांगितला. एक चाहता रोज शिवालीला I Love You असा मेल पाठवायचा.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. याच शोमधून अभिनेत्री शिवाली परब घराघरात पोहोचली.

हास्यजत्रेतून प्रसिद्धी मिळालेल्या शिवालीने काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. एका सिनेमाच्या निमित्ताने तिने नुकतीच लोकसत्ताला मुलाखत दिली.

या मुलाखतीत शिवालीने एका चाहत्याचा विचित्र अनुभव सांगितला. एक चाहता रोज शिवालीला I Love You असा मेल पाठवायचा.

शिवाली म्हणाली, "एक मुलगा मला साधारण तीन महिने रोज I Love You असा मेल करायचा".

"रोज सकाळी ११-११.३० वाजता त्याचा मेल यायचा. हे तीन महिने सुरू होतं. नंतर मी काही लक्ष दिलं नाही. कारण, हे सगळं माझी टीम बघते".

"त्यामुळे त्यांच्याकडून मला ही गोष्ट कळली. मी काही रिप्लाय दिला नाही".

"त्यानंतर पुढचा दीड महिना तो मला I Hate You असा मेल करत होता. त्यानंतर मग हे बंद झालं".

"कदाचित त्याला कळलं असेल की मी भाव देत नाहीये. पण, काही लोक खरंच खूप वेड्यासारखं वागतात".