अरुण कदम यांच्या लेकीने नऊवारीत फ्लॉन्ट केलं बेबी बंप, हटके मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 06:48 PM2023-07-29T18:48:18+5:302023-07-29T18:59:14+5:30

अरुण कदम यांची लेक सुकन्या लवकरच आई होणार आहे. सुकन्याने नऊवारीत हटके फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.

विनोदी कलाकार आणि लोकप्रिय अभिनेते अरुण कदम त्यांच्या अफलातून विनोदबुद्धीने प्रेक्षकांना हसायला भाग पाडतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून ते प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत. अरुण कदम लवकरच आजोबा होणार आहेत.

अरुण कदम यांची लेक सुकन्या गरोदर आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. त्याचे फोटोही व्हायरल झाले होते. सध्या सुकन्या तिच्या गरोदरपणातील काळ एन्जॉय करत आहे.

सुकन्याने पतीबरोबर नुकतंच मॅटर्निटी फोटोशूटही केलं आहे. या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावरील प्रेग्नंन्सीचा ग्लो स्पष्ट दिसत आहे. मॅटर्निटी फोटोशूटसाठी सुकन्याने खास पारंपरिक पेहराव केल्याचं फोटोत दिसत आहे.

नऊवारी साडी आणि दागिन्यांचा साज करत सुकन्याने मराठमोळा लूक केला होता. तर तिच्या पतीने धोतर, सदरा आणि टोपीमध्ये पारंपरिक लूक केल्याचं दिसत आहे.

सुकन्याने पतीबरोबर मॅटर्निटी फोटोशूटसाठी अनेक पोझही दिल्या आहेत. याबरोबरच तिने नऊवारीत बेबी बंपही फ्लॉन्ट केल्याचं फोटोत दिसत आहे. तिच्या या फोटोवर कमेंट करत चाहत्यांनी अभिनंदन केलं आहे.

सुकन्याच्या या हटके फोटोशूटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या नऊवारीतील मॅटर्निटी फोटोशूटची सर्वत्र चर्चा आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अरुण कदम यांची लेक सुकन्या ही ग्राफिक डिझायनर आहे. सुकन्याने डिसेंबरल २०२१मध्ये लग्नगाठ बांधली. तिच्या पतीचे नाव सागर पोवळे असं आहे. लग्नानंतर आता दीड वर्षांनी ते आईबाबा होणार आहेत.