PHOTOS : हिच्याशिवाय त्याचं पानंही हलत नाही...! पाहा, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेच्या पत्नीचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 08:00 AM2022-07-15T08:00:00+5:302022-07-15T08:00:02+5:30

Maharashtrachi Hasyajatra fame Samir Choughule : समीर चौगुलेच्या या यशात एका व्यक्तिचा खूप मोठा वाटा आहे. ही व्यक्ती गेली 24 वर्षे समीरची सावली बनून वावरतेय. ती कोण तर त्याची पत्नी...

म्हणतात ना लोकांना रडवणं सोप्प आहे पण हसवण्यात खरी कसरत आहे आणि असंच लोकांना खळखळून हसवण्याचा काम एक विनोदवीर अगदी निष्ठेने करतो तो म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका सम्या अर्थात समीर चौगुले..

समीरची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाहीच. महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम आठवला की सर्वप्रथम समीर चौगुलेचा चेहरा डोळ्यांपुढे येतो, हेच त्याचं यश आहे.

अर्थात हेच त्याचं एकट्याचं यश नाही. त्याच्या या यशात आणखी एका व्यक्तिचा मोठा वाटा आहे. ही व्यक्ती गेली 24 वर्षे समीरची सावली बनून वावरतेय. ती कोण तर त्याची पत्नी.

समीरच्या पत्नीचं नाव कविता आहे. कविता दिसायला फारच सुंदर आहे. समीर अनेकदा पत्नीसोबतचे फोटो शेअर करत असतो.

समीर आणि कविता यांच्या लग्नाला 24 वर्षे पूर्ण झाली आहेत. पती सेलिब्रिटी असूनही कविता अगदी साधी राहते. तिचा साधेपणा सर्वांचं लक्ष वेधून घेतो.

समीर हा परफेक्ट कॉमिक टायमिंग आणि लेखनामुळे प्रसिद्ध आहे.महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शो मधून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

समीर 2002 सालापासून इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. त्याचा जन्म 29 जून 1973 रोजी मुंबई येथे झाला. त्यानं त्याचं शालेय शिक्षण शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीमधून पूर्ण केलं, त्यानंतर त्यानं वाणिज्य शाखेतून आपली पदवी घेतली.

शालेय जीवनात समीरला खेळाची जास्त आवड होती. स्पोर्टसमनशीप असल्यामुळे समीर शाळा महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रमातही सहभागी व्हायचा. अशाच सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेता घेता त्याला अभिनयाची गोडी लागली.

2002 ते 2021 या कालावधीत समीरने अनेक मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट आणि मालिकांमधून काम केलंय. समीरच्या करियरला 2005 पासून खरी सुरुवात झाली.

त्याचा पहिला चित्रपट होता ‘कायद्याचं बोला’. या चित्रपटात तो अतिथी कलाकार म्हणून दिसला होता. त्यानंतर त्याच्या करिअरचा ग्राफ उंचावतच गेला.