उफ्फ्फ तेरी अदा! शॉर्ट वनपीस ड्रेसमध्ये शिवाली परबचा कूल अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 04:45 PM2024-01-10T16:45:50+5:302024-01-10T16:50:31+5:30

Shivali parab: या फोटोमध्ये शिवालीने फ्लोरल प्रिंट असलेला वनपीस शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.

छोटा पॅकेट, बडा धमाका’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाली परबला (Shivali Parab) सध्याच्या घडीला कोणी ओळखत नाही असा एकही व्यक्ती नाही.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून (Maharashtrachi Hasyajatra) ती प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. विशेष म्हणजे उत्तम विनोदशैलीसोबतच तिच्या सौंदर्यामुळे आज ती अनेकांच्या मनावर राज्य करते.

सोशल मीडियावर तिची मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. शिवाली कायम नवनवीन पोस्ट शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

शिवानीने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने वेस्टर्न आऊटफिट परिधान केला आहे.

या फोटोमध्ये शिवालीने फ्लोरल प्रिंट असलेला वनपीस शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. सोबतच तिची हेअर स्टाइल सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

श्रीमती वेणूबाई अंबोपावशे या शाळेमध्ये घेतलं. शाळेत असल्यापासून तिला नृत्य आणि अभिनयाची आवड होती.

कॉलेजमध्ये असताना शिवालीने अनेक फेस्टिवल गाजवले आणि तिथूनच शिवालीने अभिनयाला सुरुवात केली.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये येण्यापूर्वी शिवाली अनेक नाटकांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये दिसली.

सुरुवातीला शिवालीने ‘हृदयात वाजे समथिंग’ या मालिकेमध्ये काम केलं आणि त्या नंतर शिवाली ‘बँक बँचर’ या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.