'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवालीचं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 05:32 PM2023-09-29T17:32:06+5:302023-09-29T17:36:21+5:30

Shivali Parab : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. हास्यजत्रेच्या कोहली फॅमिलीला तर रसिकांकडून विशेष प्रेम मिळाले आहे. या फॅमिलीतील अवली म्हणजेच शिवाली परब सध्या चर्चेत आली आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. हास्यजत्रेच्या कोहली फॅमिलीला तर रसिकांकडून विशेष प्रेम मिळाले आहे. या फॅमिलीतील अवली म्हणजेच शिवाली परब सध्या चर्चेत आली आहे.

शिवाली परब हिने आपल्या विनोद आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

शिवाली परबचा खूप मोठा चाहता वर्ग असून ती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते आणि या माध्यमातून चर्चेत येत असते.

नुकतेच शिवाली परबने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. तिने हे फोटो शेअर करत म्हटले की, प्रेम, हसणे आणि माझ्या स्वप्नातील ड्रेससह जगणे."

या फोटोशूटमध्ये शिवालीने पर्पल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

शिवालीने मालिका व चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘प्रेम, प्रथा, धुमशान’ या चित्रपटात शिवाली मुख्य भूमिकेत दिसली होती.

शिवालीने कॉलेज जीवनापासून नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे शिवालीला एक वेगळीच ओळख मिळाली.

शिवाली परब बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते.