Mahhi Vij : "तो शेवटचा चान्स होता, मी १०० इंजेक्शन्स घेतले..."; माही विजने सांगितला वेदनादायी काळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 12:24 IST2024-12-26T12:08:29+5:302024-12-26T12:24:15+5:30
Mahhi Vij : माही विजने अभिनेता जय भानुशालीसोबत लग्न केलं आहे. २०१९ मध्ये त्यांना एक गोड मुलगी झाली.

लोकप्रिय अभिनेत्री माही विजने अभिनेता जय भानुशालीसोबत लग्न केलं आहे. २०१९ मध्ये त्यांना एक गोड मुलगी झाली. तारा असं त्यांच्या लेकीचं नाव आहे.
माहीने ईटाइम्सशी संवाद साधताना सांगितलं की, तिने वयाच्या ३४ व्या वर्षी IVF साठी प्रयत्न केला. तो काळ तिच्यासाठी खूप अवघड, वेदनादायी काळ होता.
जय भानुशालीने सांगितलं होतं की, त्याच्यासाठी आणि माहीसाठी IVF चा शेवटचा प्रयत्न होता. मी याच्यानंतर तुला फोर्स करणार नाही असं त्याने माहीला सांगून टाकलं होतं.
अभिनेत्रीने सांगितलं की, IVF च्या तीन सायकल फेल झाल्या होत्या आणि चौथ्या प्रयत्नात ती जुळ्या मुलांची आई झाली.
सुरुवातीचे तीन महिने ती पूर्णपणे बेड रेस्ट होती. फक्त सोनोग्राफीसाठीच हॉस्पिटलला जायची. इंजेक्शन देण्यासाठी देखील डॉक्टर तिच्या घरी जायचे.
बेड रेस्ट दरम्यान त्या तीन महिन्यांत माही एकदम शांत झाली होती. सोशल लाईफच तिच्यासाठी नव्हतं.
माही आणि जय या बातमीमुळे खूप आनंदात होते. पण तेव्हाच डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की, त्यांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू होऊ शकतो.
माही विजने दिलेल्या माहितीनुसार, तिची मुलगी A+ होती आणि दुसरं बाळ देखील होतं, पण ते वाचू शकलं नाही.
IVF प्रोसेस दरम्यान तिने १०० इंजेक्शन्स घेतले होते. तिची मुलगी तारा प्रीमॅच्यूअर जन्माला आली. त्यामुळेच मुलीला १०० दिवस NICU मध्ये ठेवावं लागलं.
माही विज आणि जय भानुशालीची दोन आणखी मुलं आहेत. खूशी आणि राजवीर अशी त्यांची नावं असून या कपलने त्यांना दत्तक घेतलं आहे.
तारा आता खूपच गोड दिसते. माही नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फॅमेलीचे फोटो शेअर करत असते.