mahhi vij wants to have another baby ask fans to convince husband jay bhanushali-for-the-same
आता काय म्हणावं या बयेला!! म्हणे, मला पुन्हा आई व्हायचंय; नवरोबाला समजवा...! By रूपाली मुधोळकर | Published: October 12, 2020 04:47 PM2020-10-12T16:47:24+5:302020-10-12T17:02:50+5:30Join usJoin usNext अभिनेत्री माही विजने चक्क इन्स्टाग्रामवर चाहत्यांना घातली गळ आईवडिल होण्याचा निर्णय हा एक खासगी निर्णय असतो. पण आता याचीही चर्चा सोशल मीडियावर होऊ लागलीये. अभिनेत्री माही विज हिने चक्क नेटक-यांनाच गळ घालत, दुस-या मुलासाठी नव-याला राजी करायची विनंती केली आहे. माही विजचा नवरोबा कोण तर जय भानुशाली. माहीला दुस-यांदा आई व्हायचे आहे. पण जय यासाठी राजी नाही. आता नवरा राजी नाही म्हटल्यावर या बयेने काय करावे, तर चक्क नेटक-यांना नवरोबाला समजवण्यास सांगितले. प्लीज जयला कोणीतरी समजवा त्याच्या इन्स्टाग्रामवर जाऊन कॉमेंट्समध्ये त्याला सांगा की, माहीला पुन्हा आई व्हायचे आहे. सध्या लॉकडाऊनमुळे मी खूप कंटाळले आहे. मला आणखी एक मुल हवे आहे, अशी जाहीर पोस्टच तिने शेअर केली. माही व जय यांना एक वर्षांची मुलगी आहे. तारा भानुशाली तिचे नाव. तारा एक वर्षाची होत नाही तोच माहीला दुसरे बाळ हवे आहे. दुस-या मुलाची इच्छा तिने जयसमोर व्यक्त केली. पण जयने यासाठी नकार दिला. शेवटी माहीने सोशल मीडियावरच या पर्सनल मॅटरची चर्चा सुरु केली. माही विज आणि जय भानुशाली हे हिंदी टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय कपल आहे. 2011 साली दोघेही लग्नबंधनात अडकले होते. एका पार्टीमध्ये दोघांची भेट झाली होती. त्यानंतर मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर हळुहळु प्रेमात झाले. 2019 मध्ये माही आणि जय यांच्या घरामध्ये लहानग्या ताराचे आगमन झाले. माही इन्टाग्रामवर बरीच अॅक्टीव्ह असते. तारा आणि जयसोबत अनेकदा ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. जय भानुशालीने आत्तापर्यत अनेक हिंदी मालिका आणि रिअॅलिटी शोजमध्ये काम केले आहे. मिठी छोरी नंबर 1, निलांबरी, कहानी घर घर की, कैरी: रिश्ता खट्टा मिठा अशा अनेक मालिकांमध्ये त्याने वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. माहीनेही हिंदीसोबतच दाक्षिणात्य मालिकांमध्येही काम केले आहे.टॅग्स :जय भानुशालीJay Bhanushali