सुचित्राला पाहण्यासाठी दूध केंद्रामागे लपून बसायचे आदेश बांदेकर; भन्नाट आहे दोघांची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 01:15 PM2023-04-25T13:15:03+5:302023-04-25T13:26:11+5:30

Adesh bandekar:'मला भेटत जाऊ नकोस', असं सुचित्रा यांनी आदेश यांना ठणकावून सांगितलं होतं. मात्र, ते काही केल्या ऐकत नव्हते.

छोट्या पडद्यावरील होम मिनिस्टर या गाजलेल्या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे आदेश बांदेकर. या कार्यक्रमाव्यतिरिक्त त्यांनी अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची चर्चा रंगत असते.

आदेश बांदेकरांच्या प्रोफेशनल लाइफसह त्यांच्या पर्सनल आयुष्यातील काही गोष्टी चाहत्यांना ठावूक आहेत. यात त्यांची पत्नी अभिनेत्री सुचित्रा बांदेकरविषयी तर सगळेच जण जाणतात.

सुचित्रा आणि आदेश बांदेकर यांचं लव्हमॅरेज असून त्यांची लव्हस्टोरी भन्नाट आहे. एकेकाळी सुचित्रा यांना चोरून पाहण्यासाठी आदेश बांदेकर एका दूध केंद्रामागे लपून बसायचे. एका मुलाखतीत त्यांनी याविषयी भाष्य केलं.

कमलाकर सारंग यांच्या 'रथचक्र' या मालिकेत सुचित्रा महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होत्या. तर, आदेश बांदेकर यांना या मालिकेत एक लहानशी भूमिका मिळाली होती. याच मालिकेच्या सेटवर त्यांचं सूत जुळलं.

सुचित्रा यांच्या शाळेत मुली मुलांशी फारशा बोलत नव्हत्या. त्यामुळे आपण आदेशसोबत मैत्री केली आणि तो शाळेजवळ आला तर? या भीतीने त्यांनी, 'मला भेटत जाऊ नकोस', असं आदेश यांना ठणकावून सांगितलं होतं. मात्र, तरीदेखील आदेश बांदेकर चोरून चोरुन त्यांना पाहायचा जायचे.

सुचित्रा रस्त्यावरुन निघाल्या की आदेश बांदेकर अचानक त्यांच्या समोर येऊन थबकायचे आणि अरे तू अचानक दिसलीस, असं सांगायचे. सुचित्रा यांना भेटण्यासाठी आदेश बांदेकरांची ही टेक्निक त्यांनी कित्येक काळ वापरली. इतकंच नाही तर, त्यांना पाहण्यासाठी आदेश कित्येक काळ एका दूध केंद्राच्या मागे लपून बसायचे. सुचित्रा यांना ही गोष्ट मात्र, लग्नाच्या नंतर कळाली.

दरम्यान, आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून आदेश-सुचित्रा यांच्याकडे पाहिलं जातं.

सुचित्रा आणि आदेश यांच्या मुलानेदेखील कलाविश्वात पदार्पण केलं आहे.