अभिनेत्रींवर भारी पडतीये भाऊ कदमची लेक; सोशल मीडियावर ठरतीये स्टार, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 16:17 IST2024-01-25T16:12:38+5:302024-01-25T16:17:49+5:30

भाऊची लेक सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.

'चला हवा येऊ द्या'च्या (chala hawa yeu dya) माध्यमातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे अर्थात भाऊ कदम (bhau kadam).

झगमगत्या कलाविश्वात वावरत असतांना स्टारडम मिळत असूनही भाऊने त्याच्यातील साधेपणा जपला आहे. त्यामुळेच आज लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत भाऊ कदमचं नाव आवर्जुन घेतलं जातं.

भाऊ कदमचं प्रोफेशनल लाइफ जितकं चर्चिलं जातं. तितकीच त्याच्या खासगी जीवनाचीही चर्चा नेटकऱ्यांमध्ये होते. सध्या त्याच्या थोरल्या लेकीची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे.

भाऊच्या थोरल्या लेकीचं नाव मृण्मयी कदम असं असून ती एक युट्यूबर आणि व्यावसायिका आहे.

मृण्मयी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

मृण्मयीने अलिकडेच इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने छान काठपदराची साडी नेसल्याचं दिसून येतं.

मृण्मयी महाराष्ट्रीयन लूकमध्ये कमालीची सुंदर दिसत असून तिच्या फोटोवर नेटकरी कमेंटचा पाऊस पाडत आहेत.