कामातून वेळ काढत कोकणात गेला कुशल बद्रिके; पत्नीसोबतचे फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 07:01 PM2024-05-28T19:01:23+5:302024-05-28T19:05:02+5:30

कुशल कुटुंबीयांसह कोकणात व्हॅकेशन ट्रिपसाठी गेला आहे. कोकण ट्रीपचे काही फोटो कुशलने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.

कुशल बद्रिके हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलेल्या कुशलला 'चला हवा येऊ द्या' या शोमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.

उत्तम अभिनय आणि विनोदबुद्धीच्या जोरावर कुशल प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करतो. त्याने प्रेक्षकांच्या मनाबरोबरच कलाविश्वातही स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

सध्या कुशल पत्नी आणि कुटुंबीयांसह सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. कुशल कुटुंबीयांसह कोकणात व्हॅकेशन ट्रिपसाठी गेला आहे.

कोकण ट्रीपचे काही फोटो कुशलने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कुशल पत्नीबरोबर एन्जॉय करत असल्याचं दिसत आहे.

कोकणातील सुंदर निसर्गरम्य वातावरणात कुशल आणि त्याची पत्नी दोघेही रमल्याचं पाहायला मिळत आहे.

तेथील समुद्रकिनाऱ्यावरही कुशलने पत्नीबरोबर अमुल्य वेळ घालवला. पत्नीबरोबर फोटोसाठी अभिनेत्याने पोझही दिल्या आहेत.

फोटोमध्ये कुशल आणि त्याच्या पत्नीचा कूल लूक पाहायला मिळत आहे. कुशलने प्रिटेंड शॉर्टस परिधान केले आहेत.

तर त्याच्या पत्नीने शॉर्ट आणि शर्ट घातलं आहे. दोघांचाही कूल अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

हे फोटो शेअर करत कुशलने "येवा कोकण आपलाच असो" असं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सध्या कुशल 'मॅडनेस मचाऐंगे इंडिया को हसायेंगे' या हिंदी कॉमेडी शोमधून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.