Aishwarya Narkar: पन्नाशीतही स्वतःला खूप फिट ठेवणाऱ्या ऐश्वर्या नारकरनी सांगितलं त्यांचं खरं वय, म्हणाल्या... By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 12:24 PM 2023-01-31T12:24:54+5:30 2023-01-31T14:09:18+5:30
ऐश्वर्या नारकर मराठीतल्या एक अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी वयाच्या पन्नाशीतही स्वतःला खूप फिट ठेवलंय. पन्नाशीत वर्षीही तरुणींनाही लाजवेल असे त्यांचे मनमोहक रुप आहे. ‘या सुखांनो या’ मालिकेतील हळवी भूमिका असो आणि आता ‘लेक माझी लाडकी’ मालिकेतील निगेटिव्ह भूमिका ऐश्वर्या नारकर यांनी कायम आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. म्हणूनच गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांना चाहत्यांचे प्रेम मिळत आले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
ऐश्वर्या नारकर या मराठीतील अतिशय गुणी अभिनेत्री. गेल्या अनेक वर्षांपासनं इंडस्ट्रीत काम करुन जसा त्यांचा अभिनय बहरत गेला अगदी तसंच त्यांचं व्यक्तिमत्त्वही.(फोटो इन्स्टाग्राम)
नाटक, मालिका आणि चित्रपटातून भेटणारी ही गोड चेहऱ्याची आणि सुंदर हास्याची अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या नारकर यांनी पाहिले जाते. वयाच्या पन्नाशीत वर्षीही तरुणींनाही लाजवेल असे त्यांचे मनमोहक रुप आहे. त्यांच्याकडे बघून अनेकांना वयाचा अंदाजही येणार नाही. (फोटो इन्स्टाग्राम)
ऐश्वर्या नारकर मराठीतल्या एक अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी वयाच्या पन्नाशीतही स्वतःला खूप फिट ठेवलंय.(फोटो इन्स्टाग्राम)
पण तुम्हाला माहितीये का ऐश्वर्या नारकर यांचं वय पन्नास नाही. अभिनेत्रीने स्वत: एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला.(फोटो इन्स्टाग्राम)
त्या म्हणाल्या, 'मी पन्नाशी ओलांडलेली नाहीये'. 'सोशल मीडियावर माझी बर्थ डेट चुकीची आहे. त्यामुळे थोडा घोळ होतो'.(फोटो इन्स्टाग्राम)
'बर्थ डेट चुकीची असली तरी त्याने मला काही फरक पडत नाही. पण ठिक आहे. पन्नाशीच्या जवळपास मी पोहोचलेच आहे'.(फोटो इन्स्टाग्राम)
ऐश्वर्या नारकर यांनी फिटनेसबाबत बोलताना सांगितलं, 'तुम्ही वयाच्या कुठल्या स्टेजला असला तरी फिटनेस हा आयुष्यात महत्त्वाचा आहे. मी 15 वर्षांपासून योगा करतेय.' (फोटो इन्स्टाग्राम)
ऐश्वर्या नारकर सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारत आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)