प्रथमेशनंतर आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री बांधणार लग्नगाठ; Bride To Be पार्टीचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 03:04 PM2024-01-19T15:04:35+5:302024-01-19T15:07:59+5:30

Marathi actress: या अभिनेत्रीचा होणारा नवरादेखील लोकप्रिय अभिनेता असून काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा झाला.

मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईचे वारे वाहत आहेत. अभिनेता प्रथमेश परब लवकरच त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधणार आहे. प्रथमेश पाठोपाठच आणखी एका अभिनेत्रीच्या घरी लग्नाच्या धामधुमीला सुरुवात झाली आहे.

कन्यादान या गाजलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता बने लवकरच लग्न करणार आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तिची चर्चा रंगली आहे.

मालिकेत वृंदा ही भूमिका साकारुन नावारुपाला आलेली अमृता लवकरच अभिनेता शुभंकर एकबोटे याच्यासोबत लग्न करणार आहे. त्यामुळे या दोघांच्याही घरी लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.

नुकतीच अमृताने तिची ‘Bride To Be’ पार्टी केली. या पार्टीचे फोटो समोर आले आहेत.

जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत अमृताने ही पार्टी केली. विशेष म्हणजे ही पार्टी एका निसर्गरम्य ठिकाणी झाली.

अमृताच्या मित्रांनी या पार्टीसाठी जंगी तयारी केली होती. मस्तपैकी डेकोरेशन सुद्धा त्यांनी केलं होतं.

या पार्टीसाठी अमृताने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता.