या मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? पतीसोबत करतेय स्वीत्झर्लंडमध्ये भटकंती, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 10:31 AM2024-10-01T10:31:21+5:302024-10-01T10:55:24+5:30

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पतीसोबत स्वीत्झर्लंडमध्ये भटकंती करत आहे. त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत

एका मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो शेअर केलेत. या फोटोत ती स्वीत्झर्लंडमध्ये पतीसोबत भटकंती करताना दिसतेय

ही मराठमोळी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे अमृता पवार. अमृताने सोशल मीडियावर स्वीत्झर्लंड भटकंतीचे खास फोटो शेअर केलेत

अमृता पवार आणि तिचा पती नील पाटील दोघेही स्वीत्झर्लंडला गेेले आहेत. तिथले फोटो अमृताने सोशल मीडियावर शेअर केलेत

अमृता आणि नील यांच्या रोमँटिक फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. अमृता एकदम ग्लॅमरस लूकमध्ये स्वीत्झर्लंडमध्ये सैर करताना दिसतेय

स्वीत्झर्लंडमध्ये बर्फाळ प्रदेशात अमृताने मजा केली. तिचा पती नीलने तिला साथ दिली आणि हटके फोटोशूट केलं

याशिवाय अमृताने स्वीत्झर्लंडमधील खास जागांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. या जागा दिसायला खूप सुंदर दिसत आहेत

अमृताला आपण 'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेत अभिनय करताना पाहिलंय. अमृता सध्या २१७ पद्मिनी धाम नाटकात अभिनय करताना दिसतेय