'घरोघरी मातीच्या चुली' फेम प्रतिक्षा मुणगेकरचा साऊथ इंडियन लूक; साधेपणाने जिंकली नेटकऱ्यांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 05:19 PM2024-12-02T17:19:00+5:302024-12-02T17:24:53+5:30

'घरोघरी मातीच्या चुली' फेम प्रतिक्षा मुणगेकरचा दाक्षिणात्य अंदाज, नव्या फोटोशूटची होतेय चर्चा.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय खलनायिका म्हणून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे प्रतिक्षा मुणगेकर.

'घाडगे & सून', 'जीव माझा गुंतला' यांसारख्या मालिकांमध्ये खलनायिकी पात्र साकारून प्रतिक्षा घराघरात पोहोचली आहे.

उत्कृष्ट अभिनयामुळे प्रतिक्षाने सोशल मीडियावर तिचा भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

सध्या अभिनेत्री स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे.

या मालिकेत 'ऐश्वर्या' असं तिच्या पात्राचं नावाचं आहे.

दरम्यान, अभिनेत्री सध्या तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

पांढऱ्या रंगाची साडी त्याला सोनेरी बॉर्डर शिवाय त्यावर साजेसे दागिने परिधान करून तिने साऊथ इंडियन लूक केला आहे.

या फोटोशूटसाठी हटके पोज तिने प्रतिक्षाने चाहत्यांचं लक्ष स्वत: कडे वेधलं आहे.