अरुंधतीप्रमाणेच अगदी साधीभोळी आहे मधुराणीची आई; पाहा तिच्या रिअल लाइफ आईचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 06:00 AM2022-05-11T06:00:00+5:302022-05-11T06:00:01+5:30

Madhurani gokhale prabhulkar:मधुराणीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आणि तिची आई दिसून येत आहेत. विशेष म्हणजे तिच्या आईच्या आईकडे पाहिल्यावर अनेकांनी त्यांची तुलना अरुंधतीच्या स्वभावासोबत केली आहे.

आपल्या उत्तम अभिनयासह स्वभावातील साधेपणामुळे प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यशस्वी ठरलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर.

आजवर असंख्य मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये काम करणाऱ्या मधुराणीला 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.

सध्या या मालिकेत ती अरुंधती या साध्याभोळ्या गृहिणीची भूमिका साकारत आहे. मात्र, हीच गृहिणी घराबाहेर पडून स्वत:च्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे.

अरुंधतीमध्ये प्रत्येक गृहिणी स्वत:ला पाहात असल्यामुळे ही मालिका आणि भूमिका विशेष लोकप्रिय झाली. इतकंच नाही तर अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणीविषयी जाणून घेण्यासाठीही प्रेक्षकांचे प्रयत्न सुरु झाले.

मधुराणी सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा ती तिच्या वैयक्तिक जीवनातील गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते.

उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच कवयित्री असलेली मधुराणी अनेकदा तिच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते.

अलिकडेच तिने मदर्स डे साजरा केला. यावेळी तिने तिच्या आईसोबतचा एक गोड फोटो शेअर केला. या फोटोकडे चाहत्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

मधुराणीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आणि तिची आई दिसून येत आहेत. विशेष म्हणजे तिच्या आईच्या आईकडे पाहिल्यावर अनेकांनी त्यांची तुलना अरुंधतीच्या स्वभावासोबत केली आहे.

मधुराणीची आई अगदी अरुंधतीप्रमाणे साधीभोळी असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.