डिझायनर ड्रेसमध्ये पूजा बिरारीचं कमाल फोटोशूट; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 05:39 PM2024-01-12T17:39:54+5:302024-01-12T17:59:26+5:30

Pooja birari: पूजा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिचे ग्लॅमरस, बोल्ड, हटके फोटो शेअर करत असते.

साजना मालिकेतील रमा तुम्हाला आठवते का? साधी, सालस आणि सोज्वळ अशी ही रमा या मालिकेमुळे तुफान लोकप्रिय झाली. ही भूमिका अभिनेत्री पूजा बिरारी हिने साकारली होती.

या मालिकेत साध्या, गावातील मुलीची भूमिका साकारणारी पूजा खऱ्या आयुष्यात चांगलीच ग्लॅमरस आहे.

पूजा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिचे ग्लॅमरस, बोल्ड, हटके फोटो शेअर करत असते.

यावेळी पूजाने तिचे लेहंगा चोलीतील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. पूजाने क्रिम कलरचा नेट असलेला लेहंगा परिधान केला आहे. या लेहंगा-चोलीवर हेवी वर्क करण्यात आलं आहे.

पूजा या फोटोमध्ये कमालीची सुंदर आणि मनमोहक दिसून येत आहे.

पूजा छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने साजना, ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण यांसारख्या मालिकेत काम केलं आहे.

अलिकडेच ती स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा या मालिकेत झळकली होती.