रेशम टिपणीसच्या लेकीने सावत्र आईसोबत शेअर केला फोटो, अभिनेत्रीची मुलं करतात काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 02:39 PM2024-06-27T14:39:28+5:302024-06-27T14:55:27+5:30

रेशम टिपणीसला पहिल्या पतीपासून मानव आणि रिषिका ही दोन मुलं आहेत. हे दोघं सध्या काय करतात?

मराठमोळी अभिनेत्री रेशम टिपणीसचे (Resham Tipnis) लाखो चाहते आहेत. एकेकाळी आपल्या सौंदर्याने, मराठमोळ्या ठसक्याने भल्याभल्यांना घायाळ केले होते. आजही वयाच्या पन्नाशीत ती कमालीची सुंदर दिसते.

रेशमने आजवर अनेक मराठी, हिंदी मालिका, नाटक, सिनेमांमध्ये काम केलं. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामुळेही ती प्रकाशझोतात आली होती. तसंच शाहरुखच्या आयकॉनिक 'बाजीगर' सिनेमातली तिची भूमिका लक्षवेधी होती.

रेशमचं वैयक्तिक आयुष्यही कायम चर्चेत राहिलं. 1993 साली तिने हिंदी अभिनेता संजीव सेठशी लग्नगाठ बांधली. त्यांना मानव आणि रिषिका ही मुलं झाली. मात्र लग्नाच्या तब्बल ११ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला.

संजीव सेठ यांनी नंतर 2009 साली हिंदी अभिनेत्री लता सभरवालशी लग्नगाठ बांधली. त्यांना आरव हा मुलगा झाला. तर रेशम टिपणीस सध्या संदेश किर्तीकरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे.

रेशमची दोन्ही मुलं रिषिका (Rishika Seth) आणि मानव (Manav Seth) आता मोठी झाली आहेत. ते दोघं नक्की काय करतात याविषयी रेशमने नुकतीच एका मुलाखतीत माहिती दिली.

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत रेशम म्हणाली, "दोघंही कामात व्यग्र आहेत. ते माझी मालिकाही पाहत नाहीत. त्यांना माझ्यासाठी वेळच नाहीए. म्हणून मी सुद्धा कामात मन रमवते."

"मानव व्हीएफएक्स ग्राफिक्स डिझायनर आहे. तर रिषिकाही एका कंपनीत क्रिएटिव्ह हेड आहे. तसंच ती फ्रीलान्सिंग फोटोग्राफीही करते. जाहिरातींचं शूट, दिग्दर्शनही करते. दोघंही क्रिएटिव्ह आहेत."

पुन्हा लग्न कधी करणार? यावरही रेशमने उत्तर दिलं. ती म्हणाली, "माझा लग्नाचा विचार नाही. लग्न केलं तर काय बदल होईल गळ्यात फक्त मंगळसूत्र येईल. बाकी सगळं तसंच राहील. संदेश आणि माझं छान चाललंय लग्न करुन मला ते खराब करायचं नाही."

काही दिवसांपूर्वीच रेशमची लेक रिषिकाने वडील आणि सावत्र आईसोबत फोटो शेअर केला होता. यावरुन तिचं अभिनेत्री लता सभरवालसोबतही चांगलं बाँडिंग आहे हे दिसून येतं.