PHOTO: तेरी सादगी का हुस्न भी लाजवाब है...! रुपाली भोसलेच्या हटके फोटोशूटची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 16:41 IST2025-04-03T16:27:34+5:302025-04-03T16:41:57+5:30

'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलेचं सुंदर फोटोशूट, नेटकरी घायाळ

अभिनेत्री रुपाली भोसले या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही.

'आई कुठे काय करते' या मालिकेत संजना नावाचं पात्र साकारुन तिने मालिकाविश्व गाजवलं. आपल्या सहज सुंदर अभिनयाने अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे.

दरम्यान, रुपाली तिच्या हटके फॅशनसेन्साठी सुद्धा ओळखली जाते.

नुकतेच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

पिवळ्या रंगाची साडी, स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान करुन तिने सुंदर फोटोशूट केलं आहे.

या फोटोंमध्ये रुपाली कमालीची सुंदर दिसते आहे.

सध्या सोशल मीडियावर तिच्या या हटके फोटोशूटची चर्चा होताना दिसते.