'आई कुठे काय करते' मालिका संपली पण रुपाली भोसले अजूनही चर्चेत, नव्या फोटोशूटला मिळाली चाहत्यांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 18:41 IST2025-01-29T18:01:10+5:302025-01-29T18:41:08+5:30

'आई कुठे काय करते' मालिकेत संजनाच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रुपाली भोसलेने सोशल मीडियावर केलेलं नवीन फोटोशूट चर्चेत आहे (rupali bhosle)

रुपाली भोसले ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. रुपाली भोसलेने 'आई कुठे काय करते' मालिकेतून प्रसिद्धी मिळवली

रुपाली भोसलेने सोशल मीडियावर साडीत केलेलं फोटोशूट व्हायरल झालंय. या फोटोंमध्ये रुपाली खूप सुंदर दिसतेय

काळी साडी आणि त्यावर साजेसा श्रृंगार परिधान करुन रुपालीने हे खास फोटोशूट केलंय. एका इव्हेंंटला रुपाली सहभागी झाली होती

'आई कुठे काय करते' मालिकेतील संजनाची भूमिका साकारुन रुपाली भोसले घराघरात लोकप्रिय झाली. रुपालीने खलनायकी व्यक्तिरेखा साकारली तरीही ती प्रेक्षकांना आवडली

रुपाली भोसले बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. रुपाली अलीकडच्या काळात हिंदी मालिकांमध्येही दिसली

रुपाली भोसले सध्या कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये काम करत नाहीये. रुपाली भोसलेच्या नवीन मालिकेची किंवा सिनेमाची तिच्या चाहत्यांना आतुरता आहे.

रुपाली भोसले सोशल मीडियावर कधी मॉडर्न तर कधी पारंपरिक अंदाजात फोटोशूट करत असते. रुपाली भोसलेने काहीच दिवसांपूर्वी नवीन घर घेतल्याची गुड न्यूज तिच्या चाहत्यांना दिली