'आभाळमाया'मधली आकांक्षा आठवतेय का? 'सावरखेड एक गाव' मध्येही दिसली; सध्या काय करते अभिनेत्री?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 01:54 PM2024-07-14T13:54:22+5:302024-07-14T14:03:25+5:30

ही मराठमोळी अभिनेत्री सध्या काय करते?

मराठी कलाविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या एकाएकी पडद्यावरुन गायब झाल्यात. कोणी संसारात रमलं तर कोणी अभिनय क्षेत्राला राम राम केलाय.

'आभाळमाया' या टीव्हीवरील सर्वात गाजलेल्या मालिकेतली आकांक्षा आठवतेय का? अभिनेत्री संज्योत हर्डीकरने (Sanjyot Hardikar) ही भूमिका साकारली होती. मनवा नाईकची ती बहीण होती. तेव्हा ती अगदीच तरुण आणि क्युट होती. आता संज्योत नक्की कुठे आहे आणि काय करते माहितीये का?

सिनेमा, मालिका, नाटक अशा सर्वच क्षेत्रात अभिनेत्री संज्योत हर्डीकरने काम केलं.'सावरखेड एक गाव' या गाजलेल्या सिनेमातही ती झळकली होती हे तुम्हाला आठवत असेलच. शिवाय 'तरुण तुर्क म्हातारे अर्क' नाटकात ती 'धामी' या भूमिकेमुळे गाजली.

संज्योत सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. तरी ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते हे फार कमी जणांना माहित असेल. संज्योतचं स्वत:चं युट्यूब चॅनल आहे. यावर ती अनेक दैनंदिन व्हिडिओ शेअर करत असते.

संज्योत 20 मे 2003 साली मिलिंद रहातेसोबत लग्नबंधनात अडकली. तिला दोन मुलंही आहेत. संज्योतने मुलांसोबतचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केलेत.

सध्या संज्योत मेंटल हेल्थ प्रोफेशनल म्हणून काम करते. बऱ्याच ठिकाणी ती वर्कशॉपही घेते. याची झलकही तिच्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळत आहे.

2013 साली संज्योतने स्वत:चे पुस्तक लिहिले होते. जवळचा मित्र आणि अभिनेता श्रेयस तळपदेच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं.