Snehlata Vasaikar: खतरनाक! ऐतिहासिक भुमिका साकारणाऱ्या स्नेहलता वसईकरचं आणखी एक फोटोशूट चर्चेत By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 12:55 PM 2022-07-20T12:55:15+5:30 2022-07-20T13:02:12+5:30
Snehlata Vasaikar: सध्या स्नेहलताच्या नव्या फोटोशूटची चर्चा आहे. तिच्या या नव्या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोशूटमध्ये स्रेहलताने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत. कधी स्वराज्यरक्षक संभाजी, अहिल्या मालिकेतील ऐतिहासिक भूमिका तर कधी ‘अनुराधा’ सिरीजमध्ये साकारलेली जिगरबाज लेडी पोलीस ऑफिसर अशा वेगवेगळ्या रूपात दिसलेली अभिनेत्री स्नेहलता वसईकरच्या फोटोशूटची नेहमीच चर्चा होताना दिसते.
स्रेहलता वसईकर ही एक गुणी आणि लोकप्रिय अभिनेत्री. विशेषत: ऐतिहासिक भुमिकांसाठी खास ओळखली जाणारी. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेत तिने साकारलेली सोयरा बाईसाहेब ही भूमिका प्रचंड गाजली होती.
सध्या तिच्या नव्या फोटोशूटची चर्चा आहे. तिच्या या नव्या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोशूटमध्ये स्रेहलताने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
काहींनी तिच्या फोटोंचं कौतुक केलं आहे तर काहींनी नेहमीप्रमाणे तिला ट्रोल केलं आहे. ऐतिहासिक भुमिका साकारणाऱ्या कलाकारांना पारंपरिक लुकमध्ये पाहण्यास प्रेक्षकांचे डोळे सरावले असतात. त्यामुळे स्रेहलताचं हे रूप काही जणांना खटकलं आहे.
काहींना याला म्हातारं चाळे म्हटलं आहे. म्हातारं चळ लागला तुम्हाला, अशी कमेंट एका युजरने केली आहे. काहींनी तिला मराठी इंडस्ट्रीतील मलायका अरोरा म्हटलं आहे.
स्रेहलता सोशल मीडियावर सतत स्वत:चे ग्लॅमरस, बोल्ड फोटो शेअर करत असते. यावरून ती अनेकदा ट्रोलही होते. पण स्नेहलताला यामुळे फरक पडत नाही.
मी एक कलाकार आहे आणि माझं एक खासगी आयुष्य सुद्धा आहे... मी रील आणि रिअल लाईफ ही वेगवेगळी ठेवणच पसंत करते ..., अशी तिची भूमिका आहे आणि त्यामुळे जग काय म्हणेल याची तिला अजिबात पर्वा नाही.
स्रेहलताने ‘फू बाई फू’मधून तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, ऐतिहासिक भूमिकांमुळे तिला खरी लोकप्रियता मिळाली. स्नेहलताने मराठीसह हिंदी ऐतिहासिक मालिकांमध्येही काम केलं आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई, स्वराज्यरक्षक संभाजी या ऐतिहासिक मालिकांमध्ये ती झळकली आहे.
स्नेहलताने संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमात भानू ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचंही चांगलंच कौतुक करण्यात आलं होतं.
काही हिंदी मालिकेतून अभिनय साकारत असताना तिने ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावरून विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय काही शोचे सूत्रसंचालन केलं होतं.