मायेचा पदर! पूजाच्या लग्नासाठी सुखदाने नेसली खास आईच्या ठेवणीतली साडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 16:15 IST2024-02-29T16:09:13+5:302024-02-29T16:15:36+5:30
Sukhada khandkekar:सुखदाने पूजाच्या लग्नासाठी खास तिच्या आईची साडी नेसली होती. या साडीतील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सुखदा खांडकेकर. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर सुखदा आज लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
मराठी कलाविश्वासह सुखदा हिंदी मालिकाविश्वातही चांगलीच सक्रीय आहे. तिने आजवर अनेक गाजलेल्या हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.
सुखदाने बाजीराव मस्तानी, उमराव, गुरुकूल यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलं आहे.
सुखदा सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. अलिकडेच तिने अभिनेत्री पूजा सावंत हिच्या लग्नाला हजेरी लावली होती.
पूजाच्या लग्नात सुखदाने तिचं खास फोटोशूट केलं आहे. यातील काही निवडक फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले.
सुखदाने खास तिच्या आईची ठेवणीतली साडी पूजाच्या लग्नात नेसली होती. या साडीतील फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये आईची साडी असल्याचं सांगितलं आहे.
सुखदा लोकप्रिय अभिनेता अभिजीत खांडकेकर याची पत्नी आहे. अभिजीत आणि तिने १ फेब्रुवारी २०१३ मध्ये लग्नगाठ बांधली आहे.