एजेंची लीला! आडनावाऐवजी का लावते वडिलांचं नाव? वल्लरी विराजने सांगितलेलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 12:46 IST2025-04-07T12:34:40+5:302025-04-07T12:46:19+5:30
चार्टर्ड अकाऊंटंट असणाऱ्या वल्लरीच्या वडिलांनी 'या' गाजलेल्या सिनेमांची निर्मिती केली आहे.

झी मराठीवर गाजत असलेली मालिका 'नवरी मिळे हिटलरला' मधून लीलाच्या भूमिकेत अभिनेत्री वल्लरी विराजने (Vallari Viraj) सर्वांचं मन जिकलं. तिची एजेंसोबत म्हणजेच राकेश बापटसोबतची केमिस्ट्री खूप लोकप्रिय होत आहे.
वल्लरी विराजने याआधी 'पुण्यश्लोक अहिल्याबाई' मालिकेत पार्वतीबाई भूमिका साकारली होती. तसंच ती 'छूमंतर','कन्नी' या मराठी सिनेमातही झळकली.
वल्लरी २५ वर्षांची असून मुंबईचीच आहे. बालमोहन विद्यामंदिरमध्ये तिचं शिक्षण झालं. नंतर डहाणुकर कॉलेजमधून तिने पदवी घेतली. तिला कायमच अभिनय क्षेत्रात यायचं होतं.
वल्लरीला या क्षेत्रात येण्यासाठी तिच्या वडिलांचा मोठा पाठिंबा मिळाला. आडनाव न लावता वडिलांचंच नाव लावण्याचं 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत तिने कारण सांगितलं होतं.
वल्लरी म्हणाली होती की, "अभिनय क्षेत्रात येणं हे जितकं माझं स्वप्न होतं तितकंच बाबांचंही होतं. अगदी ऑडिशनच्या आधीही मी प्रत्येक स्क्रीप्टबाबत त्यांच्याशी चर्चा करायचे. व्हिडिओ पाठवायच्या आधी बाबांशी बोलायचे."
"प्रत्येक गोष्टीत ते माझ्यासोबत आहेत. आज तुम्हाला काम करताना माझा चेहरा दिसत असला माझे बाबा सतत माझ्या बरोबर आहेत. प्रत्येक गोष्टीत ते मार्गदर्शन करतात."
"माझा फक्त चेहरा दिसतो पण मेहनत आम्हा दोघांची आहे. म्हणून अगदी सुरुवातीपासूनच माझं ठरलेलं की मी वल्लरी विराज असंच नाव लावणार आहे आणि मी तसंच केलं."
वल्लरीचं आडनाव लोंढे आहे. तिचे वडील विराज लोंढे सीए आहेत. तसंच त्यांनी 'नाळ','अलिबाबा आणि चाळीशीतले चोर' या दोन सिनेमांची निर्मिती केली आहे.