जुळून येती रेशीमगाठी! मालिकेच्या सेटवर जमल्या जोड्या, बांधली लग्नगाठ, पाहा कोण आहेत ते? By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 06:21 PM 2024-12-02T18:21:30+5:30 2024-12-02T18:33:13+5:30
कलाविश्वात अशा बऱ्याच जोड्या आहेत, ज्यांचे सूत हे मालिकेच्या सेटवरच जुळले होते. मालिकेत शूट करता करताच ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. आणि त्यामुळेच मालिकेतले नायक नायिका खऱ्या आयुष्याचेही जोडीदार बनले कलाविश्वात अशा बऱ्याच जोड्या आहेत, ज्यांचे सूत हे मालिकेच्या सेटवरच जुळले होते. मालिकेत शूट करता करताच ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. आणि त्यामुळेच मालिकेतले नायक नायिका खऱ्या आयुष्याचेही जोडीदार बनले
कलर्स मराठी वाहिनीची मालिका जीव माझा गुंतला मालिकेतले अंतरा मल्हार म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौगुले काही महिन्यांपूर्वीच मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि त्यानंतर दोघांनीही याच वर्षी ३ मार्च २०२४ रोजी अचानक लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.
अभिनेता संकेत पाठक आणि सुपर्णा श्याम हे कपल देखील दुहेरी मालिकेत पाहायला मिळालं होतं. मालिकेच्या सेटवरच दोधेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. तर मागच्या वर्षी एप्रिल २०२३ महिन्यात दोघांनीही धुमधडाक्यात लग्नगाठ बांधली.
तू जीवाला गुंतवावे या मालिकेत शिवानी आणि अजिंक्यने एकत्र काम केले होते. तर तेव्हाच त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. तब्बल ८-९ वर्षे डेट केल्यानंतर या वर्षी फेब्रुवारी २०२४ मध्ये दोघांनीही लग्न केले. अगदी धुमधडाक्यात हा लग्नसोहळा पार पडला.
दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटेंचा मुलगा अभिनेता शुभंकर एकबोटे आणि अमृता बने यांचंही असंच आहे. सन मराठी वाहिनीच्या कन्यादान या मालिकेत दोघांनीही एकत्र काम केलंय. तर याच मालिकेच्या सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. तर या वर्षी एप्रिल २०२४ मध्ये दोघांचाही विवाहसोहळा पार पडला.
तू अशी जवळी राहा या मालिकेतून लोकप्रिय झालेले तितिक्षा आणि सिद्धार्थ देखील एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर याच वर्षी फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांनी थाटामाटात लग्न केले.
तुझ्यात जीव रंगला मधील प्रेक्षकांचे लाडके राणादा आणि पाठकबाई अर्थातच अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी. मालिकेतले हे हिरोहिरॉइन खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले. अचानक साखरपुडा करत त्यांनी सगळ्यांनाच मोठा सुखद धक्का दिला होता. डिसेंबर २०२२ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती.
पुन्हा कर्तव्य आहे मालिकेतला अभिनेता अक्षय म्हात्रे हा हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. अनेक हिंदी मालिकांमध्ये त्याने काम केलंय.घर एक मंदिर या मालिकेतली त्याची कोस्टार श्रेनु पारेखसोबत त्याने डिसेंबर २०२३ मध्ये गुजरातमध्ये अगदी शाही विवाहसोहळा पार पडला होता.
अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांची भेट बिग बॉस मराठीच्या घरात झाली होती. तर तिथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांनी शाही थाटात लग्नगाठ बांधली होती.
सखी आणि सुव्रत यांनी झी मराठी वाहिनीवरील दिल दोस्ती दुनियादारी या २०१५ साली प्रदर्शित झालेल्या मालिकेतून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यांनी दिल दोस्ती दोबारा, आठशे खिडक्या नऊशे दारं या मालिकांमध्ये तर अमर फोटो स्टुडिओ नाटकामध्ये एकत्र दिसले. ते दिल दोस्ती दुनियादारीच्या शूटींग दरम्यान भेटले. पुढे त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमांमध्ये होऊन त्यांनी २०१९ साली लग्न केले. सखी ही प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांची कन्या आहे.