अदिती द्रविडची फुलांच्या नगरीत सफर; आई-वडिलांसोबत कास पठारावर एन्जॉय करतेय व्हेकेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 03:28 PM2024-09-02T15:28:52+5:302024-09-02T15:43:15+5:30

अदिती द्रविड मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

तिने वेगवेगळ्या मालिकांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं.

अलिकडे अभिनेत्री 'बाईपण भारी देवा' या चित्रपटामुळे चर्चेत आली होती. त्यामधील 'मंगळागौर' हे गाणं तिने लिहलं आहे.

सोशल मीडियावर अदितीचा दांडगा वावर आहे. त्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात येत असते.

सध्या अदिती तिच्या आई-वडिलांसोबत साताऱ्यातील कास पठारावर व्हेकेशन एन्जॉय करत आहे.

त्याचे काही खास फोटो तिने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत.

निसर्गरम्य परिसर, चहुबाजुला दाट, हिरवीगार झाडी शिवाय त्यात पावसाची संततधार आणि धुक्याची चादर असं निर्सगाचं वरदान लाभलेल्या कास पठारावर अदितीची आपल्या कुटुंबियांसोबत भ्रमंती सुरु आहे.

"Thankful for August" असं कॅप्शन देत तिने हे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

अदितीच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केल्याचं पाहायला मिळतंय.

अदितीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर 'माझ्या नवऱ्याची बायको', 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकांमध्ये ती झळकली आहे.