PHOTO: मराठमोळी मस्तानी! अभिनेत्री अनुष्का सरकटेचा मनमोहक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 05:19 PM2024-10-18T17:19:48+5:302024-10-18T17:27:30+5:30

अनुष्का सरकटे ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर तिने चाहत्यांची मनं जिंकली.

वेगवेगळ्या मराठी मालिकांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारून अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर पांढऱ्या रंगाची घागरा चोळी परिधान करून सुंदर असे फोटो शेअर केलेत.

या लूकमध्ये अनुष्का फारच सुंदर दिसते आहे. अभिनेत्रीने या फोटोंमध्ये 'मस्तानी' लूक रिक्रिएट केला आहे.

"Unleashing the royal aur, mastani vibes only..." असं कॅप्शन तिने या फोटोंना दिल्याचं पाहायला मिळतंय.

'लक्ष्मीनारायण', कारभारी लय भारी' तसेच '३६ गुणी जोडी' या मालिकेत अनुष्काने काम केलं आहे.

अनुष्काचा हा मनमोहक अंदाज नेटकऱ्यांना फारच आवडल्याचा दिसतोय.