मोहे रंग दो लाल...! 'कुन्या राजाची गं तू रानी' फेम अभिनेत्री पूर्णिमा डेचा घायाळ करणारा लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 05:01 PM2024-10-16T17:01:42+5:302024-10-16T17:09:10+5:30

स्टार प्रवाहवरील 'कुन्या राजाची गं तू रानी' या मालिकेमुळे अभिनेत्री पूर्णिमा डे प्रसिद्धीझोतात आली.

या मालिकेत तिने मृण्मयी नावाची व्यक्तिरेखा साकारली होती.

पूर्णिमा डे ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

'तुला पाहते रे' मालिकेतून तिने मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण केलं.

नुकतंच अभिनेत्रीने लाल रंगाच्या लेहेंग्यात सुंदर फोटोशूट केलं आहे.

या फोटोंमध्ये पूर्णिमाने हटके पोज देत नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

शिवाय निसर्गाच्या सानिध्यात अभिनेत्री पूर्णिमा डे रमलेली पाहायला मिळते आहे.

पूर्णिमाचे हे व्हायरल फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.