गणेशोत्सवासाठी अभिनेत्री रुचिरा जाधव पोहोचली कोकणात: फोटो शेअर करत दिला आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 01:49 PM2024-09-12T13:49:33+5:302024-09-12T13:56:31+5:30

अभिनेत्री रुचिरा जाधव गणेशोत्सवासाठी आई-वडिलांसोबत तिच्या मुळगावी कोकणात पोहचली आहे.

सध्या घराघरांमध्ये, मंडपांमध्ये विराजमान झालेले गणराय आणि त्यांच्या पाठोपाठ आलेल्या माहेरवाशीण गौराईंमुळे सगळीकडे उत्साहाचे, चैतन्याचे वातावरण आहे.

गणेशाचे आगमन झाल्यानंतर सर्वत्र उत्साह, जल्लोषाने वातावरण भारावून गेले आहे. प्रत्येक जण आपापल्यापरीने गणेशाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे.

अशातच अभिनेत्री रुचिर जाधव यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात चिपळूणला गेल्याचं पाहायला मिळतंय. त्याचे काही खास फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

गणेशोत्सवात कोकणात भक्तीमय उल्हासाचे वातावरण असते. गणपतीसाठी मोठ्या संख्येने कोकणवासी आपल्या गावाकडे जातात. रुचिरासह तिचे कुटुंबिय देखील गावी कोकणात आले आहेत.

"बाप्पा म्हणाला, पुढच्या वर्षी नाही.. याच वर्षी ये, बाप्पांसाठी आणि माझ्या पप्पांसाठी.. गेलेच" असं भलमोठं कॅप्शन लिहित तिने इन्स्टागारमवर फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये रुचिरा तिच्या आई-बाबांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहे.

मराठी कलाविश्वातील बिनधास्त अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधव ओळखली जाते.

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत तिने मायाची नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. या मालिकेने खऱ्या अर्थाने तिला नवी ओळख मिळवून दिली.

शिवाय 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात रूचिराने बिग बॉसचं घर दणाणून सोडलं होतं.

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यावाचून करमेना’, ‘प्रेम हे’, ‘बे दुणे दहा’, ‘माझे पती सौभाग्यवती’ अशा मालिकांमध्येही ती झळकली.