"सुंदर-सुंदर, वो हसीना बडी सुंदर..." पिवळ्या पैठणी साडीत खुललं साक्षी गांधीचं सौंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 02:13 PM2024-10-23T14:13:39+5:302024-10-23T14:21:11+5:30

'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री साक्षी गांधी घराघरात पोहचली.

या मालिकेत 'अवनी' नावाचं पात्र साकारुन तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.

सध्या साक्षी सन मराठी वाहिनीवरील 'नवी जन्मेन मी' या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे.

साक्षी सोशल मीडियावर कायमच तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत येत असते.

नुकतेच तिने पैठणी साडी नेसून सुंदर असं फोटोशूट केलं आहे.

पिवळ्या रंगाची पैठणी त्यावर साजेसे मोत्यांचे दागिने अशा पेहरावात अभिनेत्री पाहायला मिळते आहे.

साक्षीचं हे नवं फोटोशूट नेटकऱ्यांना फारच आवडलंय.

फोटोंमध्ये अभिनेत्रीचं खुललेलं सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.