'नवरी नटली...' शिवानी बावकरचा ब्राइडल लूक, VIRAL फोटोंवरून नजर हटेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 16:25 IST2024-05-17T16:12:37+5:302024-05-17T16:25:25+5:30

छोट्या पडद्यावरील नावाजलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर.

झी मराठीवरील 'लागिरं झालं जी' या मालिकेमुळे शिवानीला प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील शितली आणि आज्याच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावरच घेतलं.

सध्या शिवानी स्टार प्रवाहवरील 'साधी माणसं' या नव्या कोऱ्या सीरीयलमध्ये मुख्य भूमिकेत काम करते.

या मालिकेत अभिनेत्री 'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेता आकाश नलावडेसोबत स्क्रीन शेअर करत आहे.

दरम्यान, या मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिका आता रंजक वळणावर आली आहे.

शिवानीने 'साधी माणसं' मध्ये मीरा नावाचं पात्र साकारलं आहे. सध्या मालिकेत मीराची लगीन घाई सुरू झाली आहे.

त्यातच अभिनेत्री शिवानी बावकरने तिचे रिल लाईफ लग्नातील काही खास सोशल मीडियावर शेअर केलेत.

पिवळी साडी, डोईवर मुंडावल्या, नाकात नथ तसेच गळ्यात तन्मणी हार अशा साध्या पेहरावातील नववधू मीराचा लूक प्रचंड व्हायरल होतोय.