हिरव्या रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये खुललं स्पृहा जोशीचं सौंदर्य; फोटो चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 14:11 IST2024-12-06T14:05:42+5:302024-12-06T14:11:06+5:30
स्पृहा जोशी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नायिका आहे.

आजवर तिने वेगवेगळे मराठी सिनेमे, नाटक तसेच मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
अलिकडेच स्पृहा जोशी कलर्स मराठीवरील 'सुख कळले' या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली.
आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
दरम्यान,सोशल मीडियावरही ती बरीच सक्रिय असते.
त्याद्वारे स्पृहा तिचे नवनवीन फोटोज, व्हिडीओ शेअर करते. तसेच तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल चाहत्यांना माहिती देत असते.
नुकतेच अभिनेत्रीने हिरव्या रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट केलं आहे.
"एस्थेटिक..." असं कॅप्शन देत स्पृहाने तिचे हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिचं हे फोटोशूट नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलं आहे.