Pretty in black! 'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम गिरीजा प्रभूचं ग्लॅमरस फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 01:26 PM2024-11-25T13:26:55+5:302024-11-25T13:33:56+5:30

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गिरीजा प्रभू.

या मालिकेमुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत ती 'नित्या' नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे.

गिरीजा सोशल मीडियावरही अ‍ॅक्टिव्ह असते. त्याद्वारे तिचे फोटो व्हिडीओ ती चाहत्यंसोबत शेअर करत असते.

नुकतंच तिने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस फोटोशूट केल्याचं पाहायला मिळतंय.

या फोटोंसाठी हटके पोज देत अभिनेत्रीने चाहत्यांचं लक्ष पूर्णपणे आपल्याकडे वेधलं आहे.

"Pretty in black" असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

गिरीजा प्रभूच्या या फोटोंवर अभिनेत्री मिनाक्षी राठोड तसेच ऐश्वर्या शेटेने यांनी कमेंट्सच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.