PHOTO: सुरुची अडारकरची मेघालय भटकंती; निसर्गाच्या सानिध्यात करतेय व्हेकेशन एन्जॉय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 17:41 IST2025-01-09T17:33:20+5:302025-01-09T17:41:09+5:30
सुरुची अडारकर ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

'ओळख', 'का रे दुरावा, 'एक घर मंतरलेलं, अशा मालिंकामधून काम करत तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
अलिकडेच ती झी मराठी वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत झळकली.
दरम्यान, सुरुची अभिनयातून थोडा ब्रेक घेत सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लूटताना दिसते आहे.
नुकतेच सोशल मीडियावर सुरुचीने तिच्या व्हेकेशनचे फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये अभिनेत्री मेघालयामध्ये जाऊन सफरनामा करत असल्याची पाहायला मिळतेय.
ईशान्य भारतातील निसर्गसौंदर्याचा अद्भुत खजिना असलेल्या मेघालयातील शिलॉंग व्हॅलीमध्ये ती भ्रमंती करते आहे.
सुरुची अडारकरच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
"प्रवास म्हणजे माझा आनंद..." असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.