मराठमोळी निर्माती श्वेता शिंदे लाल रंगाच्या साडीत दिसतेय खूपच ग्लॅमरस, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 04:04 PM2024-10-09T16:04:52+5:302024-10-09T16:21:53+5:30

Shweta shinde : अभिनेत्री, निर्माती श्वेता शिंदेचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

मराठी अभिनेत्री श्वेता शिंदे (Shweta Shinde) हिने अभिनयातच नाहीतर निर्मिती क्षेत्रातही आपली छाप उमटवली आहे.

‘लागिर झालं जी’ मालिकेची निर्मिती श्वेता शिंदेनेच केली होती. या मालिकेला मिळालेल्या भरघोस यशानंतर 'साता जल्माच्या गाठी', 'मिसेस मुख्यमंत्री' आणि 'देवमाणूस 2' या मालिकांची निर्मितीही तिने केली.

श्वेता शिंदे हिने लाल रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.

श्वेता शिंदे हिने नवरात्रीच्या निमित्ताने फोटोशूट केले आहे.

श्वेता शिंदेने या फोटोशूटमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

इतकेच नाही तर तिने साडीत फिगरदेखील फ्लॉन्ट केली आहे.

श्वेता शिंदेचे साडीतले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

श्वेताने ‘कुमकुम’, ‘घराना’ यांसारख्या हिंदी आणि ‘चार दिवस सासूचे’, ‘अवघाचि संसार’ आणि ‘लक्ष्य’ यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केलं.

श्वेताने मालिकांप्रमाणे चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 'बाप रे बाप डोक्याला ताप', 'देऊळबंद', 'इश्श्य', 'यळकोट यळकोट जय मल्हार' अशा सिनेमांमध्ये श्वेता शिंदेने भूमिका साकारल्या होत्या.