'माझी तुझी रेशीमगाठ' फेम गुड्डी नेमकी कोण आहे माहितीये का? यापूर्वी केलंय 'या' मालिकेत काम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 02:59 PM2022-02-27T14:59:01+5:302022-02-27T15:02:35+5:30

Mazi tuzi reshimgath: नेहाच्या चाळीत राहणारी गुड्डी तिच्या मस्तीखोर स्वभावामुळे कायम प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. त्यामुळेच ही भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो.

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ.

या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

यश, नेहा, परी यांच्यासोबतच या मालिकेतील आणखी एक अभिनेत्री लक्षवेधी ठरते ती म्हणजे गुड्डी.

नेहाच्या चाळीत राहणारी गुड्डी तिच्या मस्तीखोर स्वभावामुळे कायम प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. त्यामुळेच ही भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो.

मालिकेत गुड्डीची भूमिका अभिनेत्री प्रणाली ओव्हाळ साकारत आहे.

प्रणालीला लहानपणापासून अभिनयाची आवड असून तिचं शालेय शिक्षण आयइएस दिगंबर पाटकर शाळेतून झालं आहे. तर, महाविद्यालयीन शिक्षण सिद्धार्थ कॉलेजमधून

प्रणालीने कॉलेजमध्ये असताना अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे.

माझी तुझी रेशीमगाठ पूर्वी ती डॉक्टर डॉन या मालिकेत झळकली आहे.